अलिबाग : कोकणला वादळाचा मोठा तडाखा बसला. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मोठे आर्थिक नुकसान झाले. तर  निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्‍हयातील नागरिक, शेतकरी यांचे प्रचंड नुकसान झाले . त्‍यानंतर केंद्र सरकारचे पथक पाहणी करून गेले . केंद्रीय पथकाच्‍या पाहाणी दौऱ्याला आज दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप केंद्र सरकारची कुठलीही मदत पोहोचलेली नाही. तसेच  त्‍याबाबतची घोषणाही केंद्र सरकारने केलेली नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३ जून रोजी आलेल्‍या निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्‍हयातील श्रीवर्धन , म्‍हसळा , माणगाव , अलिबाग, मुरुड , रोहा,  तळा हे तालुके प्रामुख्‍याने बाधित झाले. या भागातील नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. घरातील अन्‍नधान्‍य, इतर वस्‍तूंचेही नुकसान झाले. याशिवाय शेती बागायतींना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला. तब्‍बल २२ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील बागायती उध्‍वस्‍त  झाल्‍या. यात प्रामुख्‍याने नारळ सुपारीच्‍या बागांचा समावेश आहे.


राज्‍य सरकारकडून तातडीने पंचनामे 



राज्‍य सरकारकडून नुकसानग्रस्‍त नागरिकांना, बागायतदारांना मदतीचे वाटप सुरु देखील करण्‍यात आले. पूर्वीचे निकष बदलून वाढीव मदत देण्‍यात येत आहे. मात्र वादळ होवून २१ दिवस उलटून गेले तरी केंद्र सरकारची कुठलीही मदत रायगडकरांना पोहोचलेली नाही, असा वादळग्रस्तांचा आरोप आहे.


वादळानंतर तब्‍बल १२ दिवसांनी केंद्र सरकारचे पथक पाहाणी करून गेले त्‍यांलाही आता दहा दिवस उलटून गेले तरी देखील केंद्र सरकारने मदतीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. आधीच राज्‍य सरकारकडून मिळणारी मदत अपुरी असल्‍याचा दावा केला जात आहे. असे असताना केंद्र सरकारकडून थोडीफार मदत झाली तर हातभार लागेल या आशेवर इथले वादळग्रस्‍त नागरिक, शेतकरी आहेत. 


पश्चिम बंगाल, ओरिसा प्रमाणे मदत जाहीर करा - तटकरे


केंद्र सरकारच्‍या नियमानुसार त्‍यांची एनडीआरएफचे पथक येवून पाहाणी करुन गेले . या पथकाने अहवाल दिल्‍यानंतर केंद्र सरकार मदत जाहीर करते. अपवादात्‍मक स्थितीत अहवाल जाण्‍यापूर्वीदेखील केंद्र सरकार मदत जाहीर करु शकते जशी पश्चिम बंगाल आणि ओरिसाला जाहीर झाली. देखील मदत केंद्र सरकारकडून  केंद्राच्‍या मनात असेल तर त्‍यांनी महाराष्‍ट्राला ही मदत मिळणे अपेक्षित होते परंतु अद्याप एक छदामही मिळालेला नाही. तरीही आम्‍ही केंद्राची मदत मिळावी यासाठी प्रयत्‍नशील आहोत, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.