कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची जोरदार कारवाई
कोल्हापूर पोलिसांची ही कारवाई सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
प्रताप नाईक, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची जोरदार कारवाई केली आहे. मास्क न वापरणारे, विनाकारण बाहेर फिरणारे, दुकानं सुरु ठेवणारे अशा लोकांवर आज पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. कोल्हापुरात उद्यापासून देखील अशीच कारवाई सुरु राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
- मास्क न वापरणाऱ्या एकूण 206 जणांवर कारवाई
- विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 907 जणांच्यावर कारवाई
- दुकान सुरू ठेवणाऱ्यावर एकूण 17 जणांच्यावर कारवाई
- एका दिवसात 233 वाहने जप्त
उद्यापासून आणखी कडक कारवाई होणार असल्याने या कडक लॉकडाऊनला सहकार्य करण्याचं आवाहन कोल्हापूर पोलीस करत आहेत.
कडक लॉकडाऊन असताना देखील काही नागरिक विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोल्हापुरात कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.