दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. पण तो आठ दिवसांचा असणार  की चौदा दिवसांचा यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या एक-दोन दिवसात निर्णय घेणार आहेत. शनिवारी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्स मधील सदस्यांशी चर्चा केली. कोरोना विषाणूचा उद्रेक रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात चौदा दिवसांचा खडक लॉकडाउन लावावा अशी सूचना या बैठकीत टास्क फोस्टमधील बहुतांश सदस्यांनी मांडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र मुख्यमंत्री 14 दिवसांच्या लाकडांच्या बाजूने नाहीत. आधीच लॉकडाऊनला राज्यातील काही घटकांचा विरोध आहे. चौदा दिवसांचा लॉकडाऊन लावला तर लोकांचा रोष येईल. अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटते. त्यामुळे सध्या आठ दिवसांचा लॉकडाऊन लावावा अशी भूमिका या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं समजत आहे. 


आठ दिवस लॉकडाऊन लावून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर पुन्हा लॉकडाऊन काही दिवसांसाठी वाढवता येईल. मात्र एकदम चौदा दिवसांचा लॉकडाऊन नको अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याची माहिती मिळते आहे. ट्रान्सफोर्ट मधील काही सदस्य 14 दिवसांच्या लॉकडाऊनवर ठाम होते तर काही सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं 


याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य विचार करून लॉकडाऊन आठ दिवसांचा लावावा की चौदा दिवसांचा याबाबत येत्या एक-दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार आहेत. मात्र लॉकडाऊन लावताना  तो अचानक लावला जाणार नाही. लोकांना एका जागेवरून दुसर्‍या जागेवर जाण्यासाठी काही दिवसांचा अवधी दिला जाईल. 


त्यानंतर लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता मुख्यमंत्री याबाबत कधी निर्णय जाहीर करतात आणि लॉकडाऊन आठ दिवसांचा असणार की चौदा दिवसांचा याकडे राज्यातील सगळ्यांचे लक्ष लागले आहे.