मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत (Corona) वाढ होत आहे. काही आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णसंख्येत घट झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने पाच टप्प्यात अनलॉक केलं होतं. मात्र या दरम्यान नागरिकांनी कोरोना नियम पायदळी तुडवले. परिणामी आता कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात सोमवारपासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Strict restrictions in the state from Monday 28 June 2021 against the backdrop of the third wave of corona) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर डेल्टा प्लसचं संकट नव्याने उभं ठाकलं. तसेच काही दिवसांपूर्वी राज्यात डेल्टा पल्समुळे पहिला बळी गेला. यामुळे राज्य सरकारने वेळीच पाऊल उचललं आहे. तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यासाठी सरकारने यासंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. 


तिसर्‍या टप्प्यात काय सुरु राहणार? 


- अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहणार


- इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 पर्यंत सुरू राहणार


- मॉल्स, थिएटर बंदच राहतील


- रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं सकाळी 7 ते 2 सुरू राहतील


- दुपारी 2 नंतर होम डिलिव्हरी सेवा सुरू राहिल


- लोकल सेवा बंदच राहिल


- सार्वजनिक मैदानं, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत परवानगी 


- खाजगी, शासकीय कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू राहणार 


- चित्रपट, मालिकांच्या चित्रिकरणास स्टुडिओत परावनगी


- लग्न सोहळ्याला 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी 


- अत्यंसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहता येणार 


आज किती रुग्ण? 


राज्यात  दिवसभरात एकूण 9 हजार 974 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 562 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याता आतापर्यंत एकूण 57 लाख 90 हजार 113 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा 95.91 % इतका झाला आहे. तर आज कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 143 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.0% इतका झाला आहे. सध्या राज्यात 6 लाख 19 हजार 168 व्यक्ती होम क्वारटाईन आहेत.तर 4 हजार 240 व्यक्ती संस्थातमक विलिगीकरणात आहेत.  
 
संबंधित बातम्या : 


Maharashtra Corona Cases | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, दिवसभरात किती रुग्ण?


Covid​​​​-19 : तिसऱ्या लाटे आधी मुलांची लस येणार? उत्पादन सुरू झाले, क्लिनिकल चाचणीची तयारी