पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थी नेत्याने राडा घातल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सतिश देबडे असं या विद्यार्थी नेत्याचं नाव असून तो एसएफआय या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय. तो वसतिगृह क्रमांक ९ च्या खोली क्रमांक ४०२ मध्ये राहतो. मंगळवारी रात्री उशीरा त्यानं आपल्या खोलीत बराचवेळ गोंधळ घातला. दरम्यान सतिश दबडे यानं दारु पिऊन गोंधळ घातल्याचा आरोप विद्यापीठातील अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. त्यामुळे त्याचावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय.


खिडकीची काच फोडली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गोंधळाच्यावेळी सतिश याने वसतिगृहाच्या खिडकीची काच हाताने फोडली. त्यात त्याच्या मनगटाला दुखापत देखील झाली. हा प्रकार कळताच वसतिगृह प्रमुख डॉ. निकम घटनास्थळी पोहोचले. सतिशचं मानसिक संतुलन ढासळल्याने हे कृत्य केल्याची माहिती इतर विद्यार्थ्यांनी दिली. 


दारु पिऊन घातला धिंगाणा?


दरम्यान सतिश दबडे यानं दारु पिऊन गोंधळ घातल्याचा आरोप विद्यापीठातील अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. त्यामुळे त्याचावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय.