आमची शाळा बंद करू नका, चिमुरड्यांची आर्त हाक
पटसंख्येच्या निकषात न बसणाऱ्या शाळा बंद करण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश काढल्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी गुड्यावरील गावांना बसलाय.
चंद्रपूर : पटसंख्येच्या निकषात न बसणाऱ्या शाळा बंद करण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश काढल्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी गुड्यावरील गावांना बसलाय.
या गावांतील अनेक शाळा बंद करण्यात आल्यात. यात गेडामगुडा येथील आयएसओ मानांकन मिळालेली एक आदर्श शाळादेखील तडकाफडकी बंद करण्यात आली आहे.
१० पटसंख्या असल्याच्या कारणावरून ही शाळा आता बंद झाली आहे. इथले आठ विद्यार्थी उत्तम इंग्रजी बोलत असले तरी त्याचा आता फायदा नाही...
काँग्रेसने कोरपना या दुर्गम तालुक्यातील पाच शाळा पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करत आपला निषेध व्यक्त केला.
गोविंदपूर, गेडामगुडा, कोठोडा बुद्रुक, चेन्नई खुर्द आणि भोईगुडा येथील शाळा सुरु करण्याची मागणी चिमुकले विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी केली आहे.