SSC HSC Exam Extra Time : दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.  परीक्षेसाठी (SSC HSC Exam) विद्यार्थ्यांना 10 मिनिटं (Extra Time) अधिक मिळणार आहेत. या आधी हा निर्णय रद्द करम्यात आला होता. मात्र, विद्यार्थी आणि  पालकांनी याबबात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुन्हा हा निर्णय बदलण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहावी-बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्यानं दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डानं या वर्षीपासून रद्द केला होता. मात्र, विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वेळ वाढवून द्यावा अशी मागणी विद्यार्थी-पालकांनी केली होती. त्यानंतर बोर्डानं सुधारित परिपत्रक काढून जारी केला आहे. 


कॉपीला आळा घालण्यासाठी कठोर निर्बंध लागू


पुणे जिल्ह्यात दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सार्वजनिक दूरध्वनी, एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्रे, इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिका-यांनी हे आदेश पारीत केले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. 


परीक्षा केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना


दहावी, बारावी परीक्षेदरम्यान मोबाईल आणि इतर माध्यमांतून होणा-या पेपरफुटीचे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जास्तच टेन्शन घेतल आहे. परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाने जारी केल्या आहेत. कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी आदर्श कार्यपद्धती शिक्षण मंडळाने जाहीर केली.
यामध्ये प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक भरारी पथकाची नेमणूक करण्याची सूचना दिली आहे. तसेच परीक्षा केंद्रांची संख्या जास्त असल्यास आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे कॉपी बहाद्दरांना आळा बसणार आहे.