सातारा : उदयनराजे भोसलेंच्या प्रेमापोटी त्यांचे कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनं त्यांच्यावर गाणं बनवलं. एवढच नाही तर या कार्यकर्त्यानं खुद्द उदयनराजेंनाच हे गाणं ऐकवलं. हे गाणं ऐकून उदयनराजेही भावूक झाले होते. आता त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणखी एका कार्यकर्त्यानं त्याच्या ट्रॅव्हल्सच्या बसवर उदयनराजेंच्या वेगवेगळ्या छटा पेंट केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयनराजेंच्या प्रेमापोटी साताऱ्याच्या पुसेगाव येथील अक्षय जाधव या चाहत्याने त्याच्या शिवराज ट्रॅव्हल्सची बस उदयनराजेंच्या चित्रांनी सजवली आहे. या बसवर अक्षय जाधव यांनी 'स्टाईल इज स्टाईल' असं लिहिलं आहे. उदयनराजेंच्या फोटोनी सजवलेली ही बस उदयनराजेंच्या जलमंदिर या निवासस्थानी या समर्थकाने आणली.


चाहत्याचं गाणं पाहून उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी


आपल्या हटके स्टाईल चित्रांनी रंगवलेली ही बस पाहून खुद्द उदयनराजेंच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. ही स्पेशल बस पाहून उदयनराजेंनाही बससोबत फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही. बससमोर फोटो काढून उदयनराजेंनी त्यांच्या समर्थकांच्या प्रेमाला दाद दिली. 


उदयनराजेंनी मंचावरूनच म्हटलं 'हमे तुमसे प्यार कितना...'