IAS Amit Kale Success Story:   एमपीएससी, यूपीएससी उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत रुजू होणाऱ्यांच्या यशाच्या कहाण्या आपण वाचतो. या सर्वांनी अपार मेहनतीने हे यश मिळवलंय. त्यांतील अनेकांच्या वाट्याला तर कायमचा संघर्ष आलाय. पण संघर्षावर मात करत आपल्या शिक्षणाशी प्रामाणिक राहत त्यांनी हे यश मिळवलंय. अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशाच्या कहाण्या आपण झी 24 तासच्या सक्सेस स्टोरीच्या सदरातून वाचत आलोय. त्यात आजची ही कहाणी खास आहे. ही कहाणी महाराष्ट्राच्या लेकाची आहे. ही कहाणी एका तमासगिरीणीच्या पुत्राची आहे. ही कहाणी म्हणजे लाखो लोककलांवतांची मान अभिमानाने उंचावणारी आहे. ही कहाणी अमित माने यांची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित माने हे आयएएस अधिकारी आहेत. इथपर्यंत पोहोचण्यापर्यंतची त्यांची वाट खूप खडतर होती. लोककलाकाराच्या घरात त्यांचा जन्म झाला. बहुतांश लोककलाकारांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य नसतं. ना कधी सरकार दरबारी त्यांना मान सन्मान मिळत, ना कधी आपल्या कलेचा योग्य मोबादला मिळत. अशा परिस्थितीत ते आपली कला लोकांसमोर सादर करत असतात. लोककलेची पंरपरा पुढे नेत असतात. अशा परिवारात जन्म घेऊन आयएएस अधिकारी बनण्यापर्यंत मजल मारणं यामुळे अमित यांचं यश खास आहे. अमित यांनी घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज लहानपणापासूनच ऐकला.कोल्हाटी समाजात त्यांचा जन्म झाला.  तमाशाच या समाजाचे जग आहे, तमाशालाच हा समाज आपली पंढरी मानतो. आजुबाजूला शिक्षणासाठी पोषक वातावरण नसताना अमित माने यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली. 


तमाशाच्या कमाईतून उदरनिर्वाह


राजश्री काळे या तमाशा कलावंतीण म्हणून आपली कला सादर करत. गावोगावी जाऊन कला सादर करत मिळालेल्या कमाईतून आपला उदरनिर्वाह त्या भागवत असत. त्या नगरच्या राहणाऱ्या आहेत. लोककलेवर त्यांचे अतिशय प्रेम. लोककला त्यांच्या अंगात अक्षरश: भिनली होती. लावणी कला जिवंत ठेवण्यासाठी त्या नगरमधल्या सुप्यात कालिका कला केंद्र चालवायच्या. व्यवसायानं तमाशा कलावंत असलेल्या राजश्री यांच्या पोटी अमोल यांचा जन्म झाला. तमाशा कलावंतीणीच्या पोटी जन्मलेला हा पोरगा भविष्यात आपल्या आईसह जिल्ह्याचं नाव रोशन करेल, असे फार कमी जणांनाच वाटले असेल. तमाशाच्या वातावरणात अमित काळेंचे शिक्षण पूर्ण झाले. तमाशाच्या सुपारीसाठी अमित यांच्या आईला गावोगावी फिरावं लागायचं. त्यात पोराबाळांची परवड होत असे. शिक्षणाचा तर मागमूसही नसायचा. कळत्या समजत्या वयाचा झाल्यावर आमितची ढोलकीशी सलगी नको, म्हणून राजश्री यांनी काळजावर दगड ठेवत पोटच्या मुलाला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं होतं.


कोल्हाटी समाजाचं नाव उंचावलं


अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च सगळं राजश्री यांनी उचलला. लहानपणापासून मुलाला चांगले संस्कार दिला. तुला कलेक्टर व्हायचंय, हे ध्येय त्यांनी अमित यांच्या डोळ्यासमोर ठेवलं. अमित यांनादेखील परिस्थितीची जाणीव होती. त्यांनी यूपीएससी परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. दिवस रात्र एक करुन मेहनत घेतली.कोल्हाटी समाज हा तसा कायमच शिक्षणापासून दूर राहिला आहे. त्यामुळे समाजाला त्यांच्या यशाचं खूप मोठं कौतुक आहे. आयएएस बनून कोल्हाटी समाजाचं नाव आणखी उंचावलं.   


माऊलीच्या कष्टाचं चीज


अमित काळे यांच्या आई राजश्री आजही नगर - पुणे रस्त्यावर कालिका कला केंद्र चालवतात. तिथे रोज संगीत बारी होते. लावणी-सम्राज्ञी म्हणून राजश्री यांना गौरवण्यात आलं. पण आज यूपीएससीतल्या यशस्वी वीर अमितची आई हा गौरव तिला जास्त मान मिळवून देतोय. या माऊलीनं याच दिवसासाठी  केला होता अट्टाहास...  तिच्या कष्टांची आज फुलं झाली आहेत.