मुंबई : आता कोकण ते गोवा प्रवास हा आलिशान होणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. दादर - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये खास, नवीन, आलिशान विस्टा डोम कोचेस बसवण्यात आलेत. त्यामुळे प्रवास करताना खास निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादर - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमधील हे विस्टा डोम कोचेस जर्मन बनावटीचे आहेत. या कोचमध्ये सगळ्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या कोचमधील बसण्याच्या सीट्स 360 अंशात फिरू शकतात. या कोचेसमधून आता कोकणचं सौंदर्य पाहता येणार आहे.


नवीन डिझाईन केलेल्या विस्टाडोम कोच कोचमधून कोकणचे निसर्ग सौंदर्य वेगळ्या रूपात बघायला मिळणार आहे. या नवीन बदलांसोबत आणखीन एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. आता जनशताब्दी एक्स्प्रेस आधी दादर ते मडगाव अशी धावत होती. यापुढे ती दादर ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार आहे. त्यामुळे वेळेमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. 


दरम्यान, नवीन रूपातील ही जनशताब्दी एक्स्प्रेस प्रवाशांच्या पसंतीस पडेल अशी खात्री मध्य रेल्वेकडून व्यक्त करण्यात आली आहे. या गाडीतील नवीन विस्टाडोम कोच हे प्रवाशांसाठी आकर्षण ठरणार आहे. सुरक्षेच्या दृ्टीकोनातून या गाडीत नवीन यंत्रणा बसवण्यात आली आहेत.