Sudhir Tambe : नाशिक पदवीधर मतदार संघातून ( Nashik Graduate Constituency Election ) अखेर काँग्रेसकडून (Congress)  सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी मिळाली आहे. (Maharashtra Political News) सुधीर तांबे आता आपला अर्ज भरणार आहे. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून तांबेच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 


भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली, पण..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमदेवारी जाहीर करण्यावर पेच निर्माण झाला होता. तसेच भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. काँग्रेसला दे धक्का देण्यासाठी भाजपने तयारी केली होती. मात्र, काँग्रेसने जोरदार सूत्र हलवित तांबे यांच्या घरात उमेदवारी राहिल याची काळजी घेतली. तर दुसरीकडे भाजपकडून राजेंद्र विखे यांचे नाव आघाडीवर होते. दोनपर्यंत चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.


सत्यजित तांबे भाजपमध्ये जाण्याची शक्यता धूसर 


अहमदनगरमध्ये भाजप काँग्रेसला धक्का देण्याच्या चर्चा असतानाच आता काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून सूत्र फिरु लागली आहेत. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः तांबे कुटुंबाच्या संपर्कात आहेत. नाशिकचा विधानपरिषद उमेदवार ठरवण्याची मुभा तांबे कुटुंबाला देण्यात आली आहे. सत्यजित तांबे हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने तातडीने पावलं उचलल्याचं दिसतंय. स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंनी तांबे कुटुंबाशी चर्चा केल्याचं समजतंय. काँग्रेसच्यावतीने अर्ज कोणी भरावा, सुधीर तांबे की मुलगा सत्यजित तांबेंनी भरावा याची मुभा खरगे यांनी तांबे कुटुंबालाच दिलीय. तेव्हा सत्यजित तांबे भाजपमध्ये जातील याची शक्यता आता धुसरच दिसतेय. 


भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार?


नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीचा पेच सुटल्याचे दिसत आहे. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आलीय. स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी तांबे कुटुंबाशी चर्चा केल्याचं समजत आहे. काँग्रेसच्यावतीने अर्ज कोणी भरावा, सुधीर तांबे की मुलगा सत्यजित तांबेंनी भरावा याची मुभा खरगेंनी तांबे कुटुंबालाच दिलीय. तरीही नाशिककडे रवाना होताना सुधीर तांबे यांनी केलेल्या वक्तव्यानं मात्र पुन्हा नवा सस्पेन्स पाहायला मिळत होता. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनीही दुपारी दोन वाजता चित्र स्पष्ट होणार असल्याचं म्हटले आहे. तेव्हा काँग्रेसकडून नेमका अर्ज कोण भरणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. तर भाजपकडून राजेंद्र विखेंचं नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असलं तरीही त्यावर अजून शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही.