मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर : उद्या गुढीपाडवा.. त्यानिमित्तानं अहमदनगरमध्ये साखरेच्या गाठी तयार करण्याची लगबग सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुढीपाडव्याला या साखरेच्या गाठींना महत्त्व असतं. गुढीला ही माळ घातली जाते. अहमदनगरमध्ये या गाठी तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय कित्येक वर्षांपासून सुरू आहे. साधारणपणे महाशिवरात्र झाल्यानंतर गाठ्या बनवण्याच्या कामाला सुरुवात होते.


नक्षीकाम केलेल्या सागवानाच्या साच्यांमध्ये गाठी तयार केल्या जातात. या साच्यांमध्ये आधीच धागे जोडून ठेवलेले असतात. गरम पाक टाकून साचा बंद केला की लगेच हा पाक थंड होतो आणि गाठी तयार होतात...


अहमदनगरमधल्या पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करतात... शहरातला प्रत्येक हलवाई तब्बल एक टन गाठ्या तयार करतो. अहमदनगरमधल्या या माळा नाशिक, पुण्यातही विकण्यासाठी जातात तर शनिशिंगणापूर, मायंबा या गावांतल्या यात्रेतही या माळा अर्पण केल्या जातात.