नाशिक : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा उपरोधिक सत्कार करण्यासाठी जमलेल्या सुकाणू समितीच्या सदस्यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं. 


रावसाहेब दानवेंना देणार होते बुक्का शाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावसाहेब दानवे यांनी मध्यंतरी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सुकाणू समितीचे सदस्य बुक्का, काळी शाल देवून दानवे यांच्या सत्कार करणार होते. 


नाशिकमध्ये येण्याआधीच सदस्य ताब्यात


भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील लग्न सोहळा आणि रविवारी उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचं नाशिकमध्ये अधिवेशन आहे. त्यासाठी रावसाहेब दानवे आज नाशिकमध्ये आहेत. मात्र ते नाशिकमध्ये येण्याआधीच पोलिसांनी सदस्यांना ताब्यात घेतलं.