मुंबई : वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे पोलीस हवालदार सुनील टोके यांनी इच्छामरणाची याचिका केली आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना सुनिल टोके यांनी पत्र लिहलं असून इच्छामरणाची परवानगी देण्याची त्यांनी मागणी केली आहे. १६ एप्रिलला वहिनीच्या अकस्मात निधनानंतर सुनील टोके हे रजेवर गेले होते. पुण्याला असताना तब्बेत खालावल्याने रजेवर जावं लागल्याचा दावा टोके यांनी केला आहे. आपल्याला उच्च मधुमेहाचा त्रास सुरू झाल्याने नाईलाजाने रजेवर जावं लागलं. मात्र या संबधातील वैद्यकीय कागदपत्रे सादर करूनदेखील वरिष्ठांनी टोके यांच्या आजारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं, ज्याचा आपल्याला माननसिक त्रास झाला, असं टोके यांचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरिष्ठांकडून होणाऱ्या त्रासाची तक्रार मुंबई पोलीस आयुक्तांना करूनदेखील कारवाई न झाल्याने आता इच्छामरणाव्यतिरीक्त पर्याय नसल्याची व्यथा टोकेंनी मांडलीय आहे. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी साधलेला संवाद... पाहा व्हिडिओ