आमदार अनिल गोटेंचे समर्थक पिता-पुत्राची तलवार हल्ला करुन हत्या
धुळे शहरात पिता-पुत्रांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या दोघांचा मृत्यू झालाय.
धुळे : शहरात पिता-पुत्रांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. यात हल्ल्यात मुलगा वैभव पाटील याचा मृत्यू जाला तर वडील रावसाहेब पाटील गंभीर जखमी झालेत. त्यांना रुग्णालायत दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. दरम्यान, राजकीय वादातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. रावसाहेब पाटील हे आमदार अनिल गोटेंचे समर्थक होते.
रावसाहेब पाटील आणि मुलगा वैभव यांच्यावर तलवार, चॉपरसह धारदार शस्त्रानं हल्ला चढविण्यात आला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर रावसाहेब तथा रावशा दगाजी पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे धुळ्यात भीतीचं वातावरण पसरले आहे.