Nivrutti Maharaj Deshmukh Indurikar Case: पुत्र प्राप्ती बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या अडचणी वाढल्याचं चित्र दिसत आहे. निवृत्ती महाराज यांनी किर्तनादरम्यान केलेल्या एका विधानामुळे ते वादात अडकले आहेत. याच प्रकरणामध्ये खटला चालवला जाऊ नये अशी मागणी करणारी इंदुरीकर महाराजांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांविरोधात कलम 22 अंतर्गत गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


नेमकं प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सम तारखेला आणि विषम तारखेला संबंध ठेवले तर मुलगा वा मुलगी होते असे विधान इंदुरीकर महाराजांनी केले होते आणि त्यानंतर त्यांच्याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. आधी या प्रकरणामध्ये इंदुरीकर महाराजांविरोधात संगमनेर प्रथम वर्ग कोर्टाने खटला चालवायचे आदेश दिले होते. याविरोधात इंदुरीकर महाराजांनी जिल्हा कोर्टात खटला चालवू नये यासाठी याचिका केली होती. जिल्हा कोर्टाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल रद्द केला होता. मात्र त्यानंतर याबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. हायकोर्टाने सुद्धा इंदुरीकर महाराजांच्या विरोधात खटला चालवावा असा निकाल दिला. याविरोधात इंदुरीकर महाराज सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळं इंदुरीकर महाराज सुप्रीम कोर्टात गेले होते. मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने आता इंदोरीकर यांच्यावर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंदुरीकर महाराज यांचं हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप त्याच्यावर झाला. याचसंदर्भात आता कायदेशीर मार्गाने खटला चालवला जाणार आहे.


काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?


स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते. स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असं विधान इंदुरीकर यांनी आपल्या किर्तनामध्ये केलं होतं. तसेच, 'जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब,' असं सांगत इंदुरीकर यांनी, "पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला," असं इंदुरीकर महाराज यांनी पुण्यामधील जुन्नर तालुक्यातील ओझरमधील कीर्तनात म्हटलं होतं.