मुंबई : आता एक महिलांसाठी (women) गुडन्यूज आहे. महिलांसाठी आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिला. महिलांनाही आता एनडीएतून लष्करी अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थिनींनाही NDA प्रवेश परीक्षा देता येणार आहे. (National Defence Academy (NDA) exam ) याबाबत सर्वोच्च न्यायालयाने  महत्त्वाचा आणि मोठा आदेश दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनाही NDA प्रवेश परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे आता एनडीएची कवाडं विद्यार्थिनींसाठीही खुली झाली आहेत. यामुळे यापुढे एनडीएतूनही आता महिला लष्करी अधिकारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



एनडीएची प्रवेश परीक्षा विद्यार्थिनींना देता येणार आहे. 5 सप्टेंबरला होणारी एनडीएची परीक्षा विद्यार्थिनी देऊ शकणार आहेत. महिलांना एनडीएची परीक्षा का नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने आर्मीला विचारला होता. मात्र हे धोरण असल्याचे उत्तर आर्मीने दिले. त्यावर न्यायालयाने फटकारले. आर्मीचे हे धोरणच लिंगभेदावर आधारीत असल्याचे म्हटलं होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता केवळ ओटीए नाही तर एनडीएतूनही महिलांना लष्करी अधिकारी होता येणार आहे.