सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, अँबी व्हॅलीचा लिलाव अटळ
सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला अहे. पुण्यातील लोणावळ्याजवळ उभारलेल्या `अॅम्बी व्हॅली सिटी`च्या लिलावास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट शब्दांत नकार दिला.
नवी दिल्ली : सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला अहे. पुण्यातील लोणावळ्याजवळ उभारलेल्या 'अॅम्बी व्हॅली सिटी'च्या लिलावास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट शब्दांत नकार दिला.
अॅम्बी व्हॅली सिटीचा लिलाव निश्चित होणार आहे. सहारा ग्रुपचे दोन प्रोजेक्ट सेबी्कडून अवैध ठरवण्यात आले होते. त्यामुळे प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना २० हजार कोटी रुपये परत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्यानुसार ही रक्कम उभारण्यासाठी अॅम्बी व्हॅलीच्या जागतिक लिलावाची प्रक्रिया मुंबई हायकोर्टाच्या लिक्विडेटरकडून सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया थांबवण्यासाठी सुब्रोतो यॉय यांनी विनंती केली होती. ते फेटाळण्यात आली आहे.
सहारा समुहानं मुद्दल रक्कमेतल्या म्हणजेच मूळ २० हजार कोटींमधीलच एका मोठ्या रकमेचा भरणा केलेला नाही. २० हजार कोटीपैकी ९ हजार कोटी येणं बाकी आहे असंही सेबीनं म्हटलं आहे. २५ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत सहारा समुहानं रक्कम जमा करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठानं सहारा समुहाला एवढी मुदत देण्यास नकार दिला आहे.