राष्ट्रवादी अध्यक्ष पदासाठी या दोन नावांची चर्चा, कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती घोषणा केल्यानंतर पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादीमध्ये दोघांच्या नावाची प्राथमिक चर्चा आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आहे.
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर राष्ट्रवादीबरोबरच आघाडीत अस्वस्थता आहे. पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष सुप्रिया सुळे किंवा प्रफुल्ल पटेल असतील अशी जास्त शक्यता व्यक्त होत आहे. तशी चर्चा सुरु आहे. या दोघांच्या नावाची प्राथमिक चर्चा आहे. शरद पवार अध्यक्ष पद पुन्हा घेण्यास इच्छुक नसल्याने नवा अध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानुसार दिल्लीत सर्वपक्षीय संबंध प्रफुल्ल पटेल यांचे आहेत. तसेच कार्यकर्त्यांची नाराजी कमी करायची असेल तर सुप्रिया सुळे यांच्या नावाचा विचार करावा असा मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष सुप्रिया की पटेल याची उत्सुकता आहे. दरम्यान, अजित पवार यांनी अध्यक्ष पदाबाबत उत्सुक नाहीत. आपल्याला त्यात रस नाही, असे म्हणाले आहेत. त्यामुळे अजितदादा या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पवार यांचा हा निर्णय रुचला नाही. त्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी तगादा लावला. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे पवारांचा उत्तराधिकारी कोण या चर्चा सुरु झाल्या आहेत. पवारांचा उत्तराधिकारी म्हटलं की प्रामुख्यानं दोनच नावं समोर होती. यात पहिले त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि दुसरं नाव त्यांचे पुतणे अजित पवार. पण अजित पवार यांनी आपल्याला यात कोणाताही रस नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव या शर्यतीतून बाहेर पडले आहे.
पवार यांचा उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच काँग्रेसनंतर राष्ट्रवादीला महिला अध्यक्ष पद मिळू शकते, अशी एक चर्चा आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार आहेत. दिल्लीच्या राजकारणात काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. तसेच कार्यकर्ते यांना समवण्यात त्या नक्कीच यशस्वी होतील, अशी एक धारणा आहे. तसेच त्यांनी याआधी आपल्याला राज्यात परतायचं नाही, दिल्लीतच काम करणं पसंद असल्याचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होते. म्हणूनही पवारांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
त्याचवेळी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत सावली सारखे राहणारे प्रफुल्ल पटेल यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यांचे सगळ्याच पक्षातील लोकांशी चांगले संबंध आहे. तसेच पवार यांच्या जवळचे म्हणून पटेल ओळखले जातात. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे अध्यक्ष पदाची सूत्र सोपवली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चाही राष्ट्रवादीमध्ये सुरु आहे. त्यामुळे पटेल हेही अध्यक्ष होऊ शकतात, अशीही शक्यता आहे.
निवृत्तीची घोषणा करतानाच शरद पवार यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक समिती गठीत करावी अशी विनंती केली. याचबरोबर त्यांनी या समितीत कोणते सदस्य असतील याची संभाव्य नावही त्यांनी जाहीर केली. ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड करेल, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. संभाव्य समितीत प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समितीत जे नाव पुढे येईल, तोच राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष असणार आहे.