जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती : हळदी कुंकू हे सौभाग्यवतींचे लेणं मानलं जात. यामुळेच पतीच निधन झालेल्या अर्थात विधवा महिलांना  हळदी कुंकू लावले जात नाही. यामुळे विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांना हळदी कुंकू लावण्याचा मान दिला जात नाही. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी ही प्रथा मोजीत काढत नवा आदर्श निर्माण केला आहे. सुप्रिया सुळे यांनी इंदापूर मध्ये हळदी कुंकू (haldi kunku) साजरा केला आहे. विधवा महिलांना एकल शब्द वापरा असही सुप्रिया सुळे म्हणाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधवा महिला खूप अडचणीचे जगत असतात.  त्यांना एकल शब्द वापरावा पण विधवा म्हणू नका. इंदापूरातील कौठळीत एका कार्यक्रमात त्यांनी विधवा महिलांना हळदी कुंकू लावत एकल शब्द वापरण्याचे आवाहन केले. 


हळदी कुंकू हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. विधवा महिला मात्र, कधी कुंकू लावत नाहीत. यामुळेच मी ज्या ठिकाणी जाते तेथील कार्यक्रमांमध्ये विधवा महिलांना कुंकू लावायला सांगते अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 


फक्त सत्तेतील दिवस हे चांगले दिवस नसतात. विरोधातले दिवस फार चांगले असतात, मला विरोधात असताना भाषण करायला फार मजा येते अस मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले. रोज टीका करून थकले मी आता. हे रोज चुकतात म्हणून रोज टीका करावी लागते अस म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर तालुक्यातील कौठाळी येथे विकास कामांचा शुभारंभ केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.


मुलाने लावून दिले विधवा आईचे दुसरे लग्न


कोल्हापुर (Kolhapur) मधील एका तरुणाने आपल्या विधवा आईचे दुसरे लग्न लावून दिले. पतीच्या मृत्यूनंतर लग्न केलं तर समाज काय म्हणेल या विचाराने अनेक महिला आयुष्यभर विधवा राहणे पसंद करतात. पण, काही वडील, काही सासू सासरे हे विधवा झालेल्या मुलीच लग्न लावून देण्यासाठी पुढाकार घेतात. पण, वडिलांच्या निधनानंतर मुलानेच आईचा विवाह लावून दिला आहे. वडील गेल्यानंतर एकुलत्या एक युवराज आपल्या आईला विधवेच जीवन जगू नकोस कुंकू लाव मंगळसूत्र घालत जा अशा प्रकारचा हट्ट धरत होता. कोल्हापूरच्या युवराज शेले या 23 वर्षीय युवकाने वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आईचा एकटेपणा घालवण्यासाठी तिचा दुसरा विवाह लावून दिला आहे. मुलाने आईसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुलामुळे या महिलेला चौकटीबाहेर जाऊन नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे.