`मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषशास्त्राचं दुकान लावावं`
विरोधकांच्या कुंडल्या तयार असल्याच्या वल्गना करणा-या मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषशास्त्राचं दुकान लावावं
अकोला : विरोधकांच्या कुंडल्या तयार असल्याच्या वल्गना करणा-या मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषशास्त्राचं दुकान लावावं असा घणाघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या अकोला येथील शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
खासदार सुळे सध्या पक्षबांधणीचा आढावा घेण्यासाठी विदर्भाच्या दौ-यावर आहेत. शिवसेनेनं मिठाशी अन ताटाशी निष्ठा राखावी असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली आहे.