`भांडण झाले दिराशी, मात्र नवऱ्याला सोडून चालले`
हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी त्यांना नाही का म्हणेल
औरंगाबाद : हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी त्यांना नाही का म्हणेल, भांडण झाले दिराशी, मात्र नवऱ्याला सोडून चालले अशी गत हर्षवर्धन पाटील, भांडण राष्ट्रवादीशी आहे, मग ते काँग्रेस का सोडतायत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय.
तर विद्यमान आमदारावरही अन्याय व्हायला नको म्हणून त्यांच्यासमोर विधानसभेसह विधानपरिषदेचाही पर्याय आम्ही ठेवला होता. हर्षवर्धन खोटं बोलत असल्याचा दावा अजित पवारांनी केलाय.
बारामतीकरांचे सख्खे शेजारी आणि पवार कुटुंबियांचे कट्टर विरोधक असलेले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.