जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना दोषी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांना आता शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. सुरेश जैन यांना ७ वर्ष कारावास आणि शंभर कोटी दंड आणि अजून वाढण्याची शक्यता आहे. तर गुलाबराव देवकर यांना पाच वर्षे कारावास आणि पाच लाख दंड अजून वाढण्याची शक्यता असून राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी यांना प्रत्येकी चाळीस कोटी दंड आणि सात वर्षे कारावास ठोठावण्यात आला आहे. तर आरोपी सहा ते पंधरा यांना चार वर्षे कारावास आणि ४३ ते ५१ एक लाख दंड तसेच सात वर्षे चार आरोपींना शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. या निकालावर वकील समाधानी नाहीत. ते जन्मठेपेची शिक्षा व्हावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत, अशी माहिती वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, हा निकाल देताना न्यायालयाने सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. दुपारनंतर जिल्हा न्यायालय या सर्वांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सुरेश जैन , गुलाबराव देवकर यांना मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्यात आला आहे. सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह एकूण ४८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. प्रत्येकाचा घोटाळ्यात जो काही सहभाग होता त्यानुसार कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून या घोटाळा प्रकरणी तारीख वर तारीख पडत होती. मात्र आज घरकुल घोटाळ्या प्रकरणी ४८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. 


कोणाला किती शिक्षा झाली?


- शिवसेना नेते सुरेश जैन यांना 7 वर्ष कारावास आणि 100 कोटी रुपयांचा दंड


- राजेंद्र मयूर आणि जगन्नाथ वाणी, खान्देश बिल्डरला 7 वर्ष कारावास आणी प्रत्येकी 40 कोटी पर्यंत दंड 


- प्रदीप रायसोनी -  7 वर्ष आणि 10 लाखांचा दंड


-  तत्कालीन मुख्याधिकारी पी डी काळे 5 वर्ष आणि 5 लाखांचा दंड


- माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना 5 वर्ष कारावास आणि 5 लाखांचा दंड


- चोपडा विधानसभा शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांना या घरकुल घोटाळ्यात 5 वर्ष शिक्षा आणि 5 लाखांचा दंड तसेच  चंद्रकांत सोनवणे यांची आमदारकी धोक्यात


- पुष्पा प्रकाश पाटीलला 3 वर्ष आणि 1लाख दंड 


- माफीचा साक्षीदार, सिंधू कोल्हे यांचा स्वतंत्र खटला चालणार


जळगाव घरकुल घोटाळा निकाल 


- शिक्षेची सुनावणी पूर्ण
- राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी यांना प्रत्येकी चाळीस कोटी दंड आणि सात वर्षे कारावास
-  सुरेश जैन यांना ७ वर्ष कारावास आणि शंभर कोटी दंड आणि अजून वाढण्याची शक्यता
- प्रदीप रायसोनी 7 वर्ष कारावास, दहा लाख दंड
- तात्कालीन मुख्य अधिकारी पीडी काळे आणि नगरसेवक पाच वर्षे आणि पाच लाख दंड
- गुलाबराव देवकर यांना पाच वर्षे कारावास आणि पाच लाख दंड अजून वाढण्याची शक्यता 
- आरोपी सहा ते पंधरा चार वर्षे कारावास 43 ते 51 एक लाख दंड
- सात वर्षे चार आरोपींना शिक्षा आणि दंड 
- धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं दिला निकाल 
- घरकुल घोटाळ्यातील ४८ आरोपी दोषी