`मुलाच्या` हव्यासापोटी सरोगसीद्वारे मुलाला जन्म; पित्यावर गुन्हा दाखल
दोन मुली असताना सरोगसी पद्धतीनं मुलाला जन्म देणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बालहक्क आयोगानं दिलेत. विशेष म्हणजे याबाबत आरोपीनं आपल्या पत्नीलाही अंधारात ठेवलं होतं. प्रकाश भोस्तेकर असं या आरोपीचं नाव आहे.
औरंगाबाद : दोन मुली असताना सरोगसी पद्धतीनं मुलाला जन्म देणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बालहक्क आयोगानं दिलेत. विशेष म्हणजे याबाबत आरोपीनं आपल्या पत्नीलाही अंधारात ठेवलं होतं. प्रकाश भोस्तेकर असं या आरोपीचं नाव आहे.
या प्रकरणाची बालहक्क आयोगासमोर सुनावणी झाली. आपल्याला दोन 'मुली'च असल्यामुळे छळ करत असल्याचाही आरोपही पत्नी शुभांगी भोस्तेकर यांनी केलाय.
इतकंच नाही तर सरोगसी प्रसुतीसाठी प्रकाशनं जसलोक रुग्णालयात आपण अविवाहित असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केलं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर सरोगसी सबंधीत कायद्याची गरज असल्याचं बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांनी व्यक्त केलीय.
काय आहे सरोगसी प्रकरण, पाहा...
औरंगाबादमधला प्रकाश भोस्तेकार, पत्नी शुभांगी भोस्तेकार यांना दोन मुली
मुलगा हवा म्हणून सातत्यानं छळ केल्याचा शुभांगीचा आरोप
प्रकाशवर पत्नीची फसवणूक केल्याचा आरोप
पत्नीला अंधारात ठेवून सरोगसीच्या माध्यमातून मुलाला दिला जन्म
त्यासाठी जसलोक रुग्णालयात अविवाहीत असल्याचं खोटं शपथपत्र सादर केलं
शुभांगीची बालहक्क संरक्षण आयोगात धाव
प्रकाशविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आयोगाची पोलिसांना निर्देश
पतीनं केलेल्या छळाविरोधात शुभांगीची मुलुंड पोलिसांत तक्रार दाखल