Sushma Andhare : आ देखे जरा देखे किसमे कितना है दम! सुषमा अंधारे यांचे भाजपा नेत्यांना 48 तासांचे अल्टिमेटम
Sushma Andhare : बावनकुळे भाऊ, तुमची एवढी ताकद असेल तर तर 2019 मध्ये फडणवीसांनी तिकिट का कापलं? हिंमत असेल तर 48 तासांत मातोश्रीवर येवून दाखवा असे चॅलेंज सुषमा अंधारे यांनी दिले.
Sushma Andhare At Thane Mahamorcha : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेंना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्याच्या निषेधार्थ मविआ ठाणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला आहे. या मोर्चावेळी जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. फडतुस शब्दावरुन भाजप नेते उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडले. या सर्व नेत्यांना सुषमा नेत्यांनी 48 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. आ देखे जरा देखे किसमे कितना है दम... असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्यांना थेट ओपन चॅलेंज दिले आहे.
फडतूस, लाळघोटे गृहमंत्री अशा शब्दांत ठाकरेंनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले होते. यावरुनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी थेट उद्धव ठाकरे यांना धमकीच दिली होती. उद्धव ठाकरेंनी अशा शब्दांत पुन्हा टीका केली तर त्यांना घराबाहेर पडू देणार नाही अशी धमकीच बावनकुळे यांनी दिली होती.
सुषमा अंधारे यांचे बावनकुळे यांना चॅलेंज
बावनकुळे भाऊ, तुमची एवढी ताकद असेल तर तर 2019 मध्ये फडणवीसांनी तिकिट का कापलं? हिंमत असेल तर 48 तासांत मातोश्रीवर येवून दाखवा असे चॅलेंज सुषमा अंधारे यांनी दिले. फडतूस, लाळघोटे गृहमंत्री अशा शब्दांत ठाकरेंनी फडणवीसांवर हल्ला चढवला. तर, फडणवीसांनीही नागपुरी भाषेत ठाकरेंचा हल्ला परतवून लावला. फडतूस नाही काडतूस आहे मी, झुकेगा नही घुसेगा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. अगर आप काडतूस है.. तर ठाकरे बाणा ही तोफ आहे असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला आहे. इथला प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करून नेत्यासाठी तयार आहे असा विश्वास देखील अंधारे यांनी व्यक्त केला.
शेलार यांना जागा वाचवता आली नाही. फडणवीस यांच्या बाजूने बोलणाऱ्या बानवकुळे यांना फडणवीस यांनीच तिकीट दिले नाही. जेव्हा छत्रपती शिवरायांबाबद्दल अपशब्द वापरले तेव्हा तुम्हाला राग आला नाही का? बाबासाहेब तुमचे दैवत नाहीत नाही? संभाजी नगर येथील संभेमंतर गोमुत्र शिंपडण्यात आले. सगळ्या 18 अगडपखड जातीचे लोक मैदानावर उपस्थित होते. यानंतर हे गोमुत्र शिंपडण्यात आले. हा 18 अगडपखड जातीच्या लोकांच्या अपमान नाही का? भक्तांचा चॉईस किती फडतूस आहे. उद्धव ठाकरे फडतूस म्हणाले म्हणून चेकाळले.