मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा पेच अजूनही सुटलेला नाही. काँग्रेस आमदार अजूनही राजस्थानची राजधानी जयपूरमधल्या एका रिसॉर्टमध्येच आहेत. त्याठिकाणी सर्व आमदारांची बडदास्त ठेवण्यात येते आहे. आमदारांसह मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह सीएमआरमध्ये भोजनाचा आस्वाद घेतला. आमदारांच्या स्वागतासाठी भोजनाचं आयोजन केलं असल्याचं आरोग्य मंत्री रघू शर्मांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात आज राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापण्यासाठीचं संख्याबळ सादर करायचं आहे. त्यासाठी काँग्रेसची काय भूमिका आहे हे पक्षश्रेष्ठी ठरवतील असंही रघू शर्मा यांनी म्हटलं आहे.


राज्याच्या राजकारणातला आजचा दिवसही बैठका, चर्चा, खलबतं आणि वेगवान घडामोडींचा असणार आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज यशवंतराव चव्हाण केंद्रात सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला बैठक होणार आहे. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्र बैठक होणार आहे. यासोबत शिवसेनेचंही बैठकांचं सत्र सुरुच असणार आहे. तर भाजपचीही बैठक असणार आहे.