जिमलगट्टा: गडचिरोली जिल्ह्यात जिमलगट्टा इथे सुझुकी बलेनो आणि वडाप गाडी यांच्यात झालेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात वडापमधल्या ४ जणांसह बलेनो गाडीतली दोन लहान बालकंही या अपघातात दगावली. बलेनोतून मोहुर्ले कुटुंबीय प्रवास करत असताना त्यांचा अपघात झाला. 


मृतांमध्ये बालकांचा समावेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पासून ३ किमी अंतरावर असलेले गोविंदगाव जवळ आज सकाळी ९.३० च्या दरम्यान हा अपघात घडला. प्राप्त माहितीनुसार, वडापच्या गाडीतून (काळी पिवळी) वाहनात घरगुती सामान नेण्यात येत होते. दरम्यान चंद्रपूर पासिंग वाहन सुझुकी बलेनो व काळी पिवळी यामध्ये जोरदार धडक झाली. यात बलेनो मध्ये असणाऱ्या ४ जणांचे जागीच प्राण गेले तर जिमलगट्टा प्राथमिक उपकेंद्रात दाखल केल्यानंतर काळी पिवळी मधील वाहन चालक व बलेनो वाहनातील दोन लहान बाळं सुद्धा दगावली. या अपघातात ७ ठार झाले असून, चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.


परिसरात हळहळ


प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प येथील बलेनो मध्ये स्वार मोहुर्ले कुटुंब असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.