रत्नागिरी : स्वाभिमान आणि शिवसेनेत राडा झालाय. पोलिसांनी 'स्वाभिमान'वर एकतर्फी कारवाई केल्याचा माजी खासदार नीलेश राणे यांनी आरोप केलाय. तर नीलेश राणे  दहशत निर्माण करत असल्याचा खासदार विनायक राऊत यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीत सध्या स्वाभिमान विरुद्ध शिवसेना यांच्यात जोरदार राडा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानच्या अमित देसाई या कार्यकर्त्याला एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर रत्नागिरी शहरातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांच्या दुकानावर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय. 


रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. मात्र रत्नागिरीचे पोलीस गृहराज्यमंत्र्यांच्या दबावाखाली कारवाई करत असल्याचा आरोप माजी खासदार नीलेश राणे यांनी केलाय. तर नीलेश राणे रत्नागिरीमध्ये दहशतीचे वातावरण  करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.