COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलडाणा : पीक कर्ज मंजूर करुन देण्यासाठी शेतक-याच्‍या पत्‍नीकडे शरीरसुखाची मागणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यानं केली होती. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण यांच्याविरुद्ध याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. मात्र शाखाधिकारी राजेश हिवसे याला अजूनही अटक झालेली नाही. या घटनेवर आता तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या घटनेच्या निषेधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सेंट्रल बँकेच्या शाखेला काळं फसण्यात आलं. तर ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रेदशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. 


राज्याची लक्तरं वेशीवर टांगण्याचा हा प्रकार असून, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट माझा हे सरकारला विचारण्याची वेळ आल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.