मुंबई : नागपुरात कोरोनाचं संकट असताना आता व्हायरल तापासोबत स्वाईन फ्लूनंही टेन्शन वाढवलं आहे. राज्याच्या उपराजधानी स्वाईन फ्लूचेही रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 7 दिवसात नागपूरात 8 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंतच्या स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या 12च्यावर पोहोचली आहे.यापैकी काही रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे. उपराजधानीत कोरोनासह व्हायरल रुग्णांची संख्या वाढत असताना स्वाइन फ्लूचा वाढता प्रकोप आरोग्य विभागाच्या चिंता वाढवणारी आहे.


मुंबईतही स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. मुंबईत स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण आढळून आले आहेत. यातील चौघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. मुंबईत लेप्टो आणि स्वाईन फ्लूचा धोका वाढ होत असल्यानं महापालिकेनं तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली. 



एका पत्राद्वारे त्यांनी महापालिकेला उपाययोजना करण्याबाबत सांगितलंय. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. लेप्टो आणि डेंग्युच्या रूग्णांची संख्या वाढतीय. याशिवाय स्वाईन फ्लूटचाही धोका वाढतो आहे.