झुलता पूल आणि खोल दरीत कोसळणारा धबधबा
पर्यटनाचा नक्की आनंद तुम्ही घेऊ शकतात हे तुम्हाला या फोटवरून नक्कीच लक्षात आलं असेल.
रायगड : पावसाळ्यात कोकणच्या निसर्गाला वेगळाच बहर आलेला असतो. धरतीनं हिरवा शालू पांघरलेला असतो. डोंगरदऱ्यातून वाहणारे धबधबे, धरणं सर्वानाच मोहून टाकतात.
मुंबई- गोवा महामार्गावरील पोलादपूरपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर वसलेल्या घागरकोंड या दुर्गम भागातील झुलता पूल आणि खोल दरीत कोसळणारा धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरलाय. याठिकाणी अलीकडच्या काही वर्षांत पर्यटकांची गर्दी वाढतेय.
या ठिकाणी जाऊन पर्यटनाचा नक्की आनंद तुम्ही घेऊ शकतात हे तुम्हाला या फोटवरून नक्कीच लक्षात आलं असेल.