पुणे : पुण्यातील विमाननगर येथील सिम्बायोसिस महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या एका नेपाळी विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना गुरुवारी रात्री ९.०० वाजल्याच्या सुमारास उघडकीस आली. राहुल अनिल अगरवाल असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.


तो एका रो हाउसमध्ये मित्रांसोबत राहत होता. रात्री नऊच्या सुमारास राहुल घराचा दरवाजा उघडत नव्हता. दरवाजा तोडल्यानंतर राहुल गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. राहुलनं ही आत्महत्या का केली? याबद्दल अधिक तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.