चंद्रपूर : चंद्रपूरचा ताडोबा व्याघ्र प्रकल्प या वर्षी १५ दिवस आधीच सुरू करण्यात आला आहे, व्याघ्र प्रेमींसाठी आणि वन्यजीव प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. व्याघ्र प्रकल्पाची ऑनलाईन बुकिंग सुरू केल्यानंतर फुल्ल झाली आहे. पट्टेदार वाघांना पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येत असतात.


ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा भारतातील मान्सूनमध्येही पर्यटकांसाठी खुला असणारा एकमेव प्रकल्प होता. मात्र या वर्षी विदर्भात पर्जन्यमान कमी झाल्याने, उन्हाळ्यात पाण्याची भीषण संकट उदभवू शकतं, व्याघ्र प्रकल्पातही पाण्याचं दूर्भिक्ष असेल, म्हणून या वर्षी १५ दिवस आधी हा प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे.