सोलापूर : वाळू माफियांची मुजोरी कितपत वाढली आहे याची प्रचिती सोलापुरात आली आहे. उत्तर सोलापूरचे तहसीलदार विनोद ननावरे यांनी बेकायदा वाळू वाहून नेणाऱ्या डंपरचा फिल्मी स्टाईल पाठलाग केला. सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोरड्या नद्यांतून वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात होतेय. वाळू तस्कर वाळूची चोरी मध्यरात्री नंतर करतात. याबाबतची माहिती मिळताच उत्तर सोलापूरचे तहसीलदार ननावरे यांची रात्रीची गस्त घालून चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र वाळू माफिया वाळू रस्त्यावर सांडून पसार झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तहसीलदारांनी या वाळू वाहतुकीचा डंपर थांबवण्याची सूचना केली. मात्र डंपर चालक काही थांबला नाही. यानंतर तहसीलदारांनी या डंपरचा पाठलाग सुरु ठेवला. तहसीलदार पाठलाग करत असल्याचे पाहून डंपरचालकाने डंपरमधून वाळू टाकायला सुरुवात केली. पूर्ण डंपर रिकामा झाला, मात्र चालक थांबला नाही. त्याने शहराच्या बाहेर पलायन केले. या डंपरला नंबर प्लेटही नव्हती. त्यामुळे तहसीलदारांना माघारी फिरावं लागलं. मात्र हा सर्व थरार तहसिलदारांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.


पाहा व्हिडिओ