`CM शिंदे मौलवीच्या वेशात...`, `...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा`
Take Action Against Ajit Pawar Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून थेट कारवाईची मागणी केली आहे.
Take Action Against Ajit Pawar Eknath Shinde: वेश बदलून आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच 10 बैठकींसाठी दिल्लीत आलेलो असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर आता याच दाव्यावरुन देशातील नेतेच वेशांतर करुन प्रवास करत असतील तर विमानप्रवास किती सुरक्षित आहे असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांबरोबरच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकारांशी बोलतना केली आहे.
खेळ चालवला आहे
"मुंबई, दिल्लीसारख्या विमानतळावर देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी खेळ चालवला आहे," अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. "यामधून देशात घातपाताला चालना मिळू शकते. परवा अजित पवार आले आणि त्यांच्या नाट्यकलेची माहिती त्यांनी दिली. 10-12 वेळा वेश पालटून आल्याचं त्यांनी सांगितलं. बनावट नावाने आले होते असंही म्हणाले. त्यांचे ते सगळे बोर्डिंग जप्त करावेत," अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
विमानप्रवास किती सुरक्षित?
अजित पवार वेश बदलून प्रवास करु शकतात "यावरुन विमानतळाची सुरक्षा किती खोटी आहे हे यातून दिसून येतं. वेश पालटून येऊन एक व्यक्ती देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो हा या देशाच्या सिक्युरिटी सोबतचा खेळ आहे. देशातील नेतेच वेशांतर करुन प्रवास करत असतील तर विमानप्रवास किती सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण होतो. दाऊद, टायगर मेमन यांना ही संधी मिळाली होती का याचं उत्तर द्यावं, असं राऊत यांनी सरकारला सवाल विचारताना म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'लाडकी बहीण' योजनेमुळे पतीने दिला घटस्फोटाचा इशारा; कारण ठरला पुण्यातील BJP आमदार
शिंदे मैलवीच्या वेशात यायचे
"एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वेश पालटून यायचे असं त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे. ते मौलवीच्या नावाने आल्याची माझी माहिती आहे. बऱ्याच गोष्टी केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी बनावट ओळखपत्रं बनवले होते. या सगळ्याची दाखल घेऊन चौकशी होण्याची गरज आहे. अजित पवार आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल करावेत. आमच्यासाठी हा गंभीर मुद्दा आहे. आम्ही राज्याचे प्रमुख लोक बसून यावर चर्चा करु," असंही संजय राऊत म्हणाले आहेत. राऊत यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे तसेच मागणीमुळे आता वेशांतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अंगलट येणार का हे येणारा काळच सांगू शकेल.
नक्की वाचा >> 'पवार साहेबांचा पक्ष चोरून अजितदादांची..', 'सुपारीबाज'वरुन मनसे आक्रमक; 'पावसाळी बेडूक' म्हणत टीका
आधी सावरकरांना भारतरत्न द्या मग...
वीर सावकरांना भारतरत्न देण्याची मागणीही संजय राऊत यांनी पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना केली. "सावरकर यांना सन्मान द्यायचं असेल तर त्यांना भारतरत्न द्या. हा नेता क्रांतिकारकांचा शिरोमणी होता. आधी भारतरत्न द्या आणि मग आमच्याकडे या," असं राऊत यांनी म्हटलं आहे.