सोलापूर : ज्यांनी सरकारच्या बँका, तिजोरी लुटल्या आहेत, त्यांच्याकडून पैसे घ्या. तसेच स्वत:चे मत विकायचे नाही. विकायचे असेल तर जास्त किंमतीला विका. किरकोळ पैशात विकले जाऊ नका, तर भरपूर पैसे घ्या. तसेच मतदान करताना पाकीटासोबतच चपटी(दारुची बाटली) घ्या काहीही हरकत नाही, असे धक्कादायक आणि वादग्रस्त विधान साहित्यिक 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी केलेय. या विधानावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापुरातील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर मेळाव्यात लक्ष्मण माने यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. त्याचवेळी त्यांनी युवकांवर जोरदार टीका केली. सोलापुरातील युवक पैशासाठी खूप लोभी आहेत. पैशासाठी तरुण टोळकं करुन फिरतात. सोलापुरात पाकीट संस्कृती आहे. पाकीट आल्याशिवाय कोणीच बाहेर पडत नाही, असे ते म्हणालेत.


मत विकायचं नाही. विकायचं असेल तर जास्त किंमतीला विकायचं. किरकोळ पैशात विकलं जायचं नाही. भरपूर पैसे घ्यायचे. तसेच मतदान करताना पाकीटासोबतच चपटी म्हणजेच दारुची बाटली घ्या काहीही हरकत नाही. एका मताची किंमत दहा हजार रुपये घ्यायची, असा सल्लाही माने यांनी दिलाय.