पर्दाफाश! पीकविम्याच्या ७/१२ उतारासाठी तलाठी मागताय पैसे
पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी शेतक-यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागत असताना आता अर्ज भरण्यासाठी पैसेही मोजावे लागत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये पीकविम्यासाठी लागणा-या सात बाराचा उतारा देण्यासाठी तलाठी शेतक-यांकडून चक्क पैसे घेत असल्याचा पर्दाफाश झाला आहे. तसंच पीक विम्याच्या अर्जावर सही करण्यासाठीही तलाठी चिरीमीरीची मागणी करत आहेत.
मुंबई : पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी शेतक-यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागत असताना आता अर्ज भरण्यासाठी पैसेही मोजावे लागत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये पीकविम्यासाठी लागणा-या सात बाराचा उतारा देण्यासाठी तलाठी शेतक-यांकडून चक्क पैसे घेत असल्याचा पर्दाफाश झाला आहे. तसंच पीक विम्याच्या अर्जावर सही करण्यासाठीही तलाठी चिरीमीरीची मागणी करत आहेत.
विशेष म्हणजे कार्यालयातच एक जण चक्क पैसे जमा करण्यासाठी नियुक्त करण्यात आला आहे. हा सर्व संतापजनक प्रकार व्हिडिओ क्लीपमध्ये कैद झाला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्याच मतदारसंघात हा प्रकार सर्रास सुरू असल्यामुळं अधिकच संतप्त भावना व्यक्त होत आहेत. बीड जिल्ह्यात असाच प्रकार काल झी २४ तासनं उघड केला होता.