पुणे : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे (Talegaon Dhamdhere) येथे जन्मदात्या पित्याने आपल्या दोन लहान मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या (suicide) केली. या धक्कादायक घटनेनंतर गावकऱ्यांना धक्का बसला आहे. वडील राजेंद्र भुजबळ (Rajendra Bhujbal), दीक्षा भुजबळ आणि ऋतुजा भुजबळ असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुजबळ हे नोकरीनिमित्त पुण्यातील वानवडी येथे राहत होते. परंतु ते 23 तारखेला पत्नीला वानवडी येथे ठेवून आपल्या मुलींसह तळेगाव या आपल्या मूळ गावी आले होते. ते 23 तारखेपासून गायब होते. अखेर बुधवारी सायंकाळी त्यांचा गावातील एका विहिरीत दोन मुलींसह मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून याबाबत आता शिक्रापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. 


राजेंद्र भुजबळ हे नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबासमवेत वानवडी येथे वास्तव्य करीत होते . मंगळवारी कोणाला काहीही न सांगता राजेंद्र हे आपल्या दीक्षा आणि ऋतुजा या दोन मुलींना घेऊन तळेगाव ढमढेरे येथे आले होते. मात्र, त्यांच्याबाबत काहीही संशय आला नाही. त्यांनी एकदम टोकाचे पाऊस का उचलले, याची चर्चा होत आहे.


दरम्यान,  पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीतून या तिघांना बाहेर काढण्यात आले. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.