मुंबई : हवामान विभागाने येत्या 24 तासांत चक्रीवादळाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्यानमारमध्ये उत्पत्ती झाल्यामुळे चक्रीवादळाचं नाव ‘तौकते’ (Tauktae Cyclone)असं ठेवण्यात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , महाराष्ट्रासह  गुजरात, कर्नाटक, केरळच्या सागरी किनाऱ्यावर वादळीवाऱ्यासह 15 मे ते 17 मे दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवाय अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे आणि येत्या 24 तासांत हे तीव्र चक्रीवादळाचे रूप घेईल असं देखील सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तौकते चक्रीवादळामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण भागात 15 तारखेनंतर चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार असल्याचा अंदाज हवामाण खात्याने वर्तवला आहे. महत्त्वाचं म्हणजे या वादळामुळे महाराष्ट्रातही सर्व ठिकाणी टप्प्याने पाऊस पडणार आहे. 


पुढचे  पाच दिवस चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  याचा सर्वाधिक परिणाम 17 मे रोजी मुंबईत होईल. त्यानंतर चक्रीवादळ पश्चिमेच्या बाजूने पुढे सरकत 18 मेपर्यंत गुजरातच्या समुद्र किनाऱ्यांवर पोहोण्याची शक्यता आहे. सर्व परिस्थिती पाहाता सर्व मच्छीमारांना सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे.