मुंबई : मुंबईकरांना आता टॅक्सी, रिक्षाच्या भाडेवाढीचाही सामना करावा लागणार आहे. आधीच अन्नधान्य, पेट्रोल अशा जीवनपयोगी सेवा, वस्तू महागल्यानंतर आता नागरिकांना टॅक्सी, रिक्षा भाडेवाढही सहन करावी लागणार आहे. टॅक्सी, रिक्षाच्या भाड्यात २ रुपयांनी दरवाढ होणार आहे. या दरवाढीला परिवहन खात्याने नुकतीच मंजुरी दिली आहे. ३ रुपये दरवाढ करण्याचा प्रस्ताव वाहतूक संघटनांनी केला होता. यावर २ रुपये भाडेवाढ करत तोडगा काढण्यात आलाय.


प्रस्तावास मंजूरी 


पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती, वाढलेली महागाई पाहता टॅक्सी, रिक्षाच्या दरात वाढ करावी अशी मागणी वाहतूक संघटनांकडून केली जात होती. भाडे दरात ३ रुपयांनी वाढ करावी अशी मागणी वाहतूक संघटनेनी केली होती. पण परिवहन खात्यातर्फे २ रुपये भाडेवाढीस मंजूरी देण्यात आली आहे. मुंबईकरांना यापुढे टॅक्सी, रिक्षाच्या भाड्यात २ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.