नाशिक : बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थिनीकडे दोघा प्राध्यापकांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या पंचवटी महाविद्यालयात घडला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीनं पोलिसांत तक्रार दाखल केली असून प्राध्यापक सचिन सोनवणे आणि प्रवीण सूर्यवंशी या दोघांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारामुळे पीडितेला मोठा मानसिक धक्का बसला आहे. (पाहा बातमीचा व्हिडिओ शेवटी)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी पुण्यात देखील अशीच एक घटना समोर आली होती. शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. संदीप कांबळे या शिक्षकाने परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केली होती.


अशा घटना समाजासाठी नक्कीच घातक आहे. यामुळे पालकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. विद्यार्थिंनींना देखील यामुळे असुरक्षिततेचं वातावरण तयार होत आहे.