Maharashtra Teachers Recruitment: शिक्षक भरती प्रक्रियेला (Shikshak Bharti 2024) अखेर मुहूर्त सापडला आहे.  तब्बल 21 हजार जागांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात शिक्षक विभागानं प्रसिद्ध केलीय. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील शिक्षकांची भरती लवकरच होणार आहे. शिक्षण विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे  शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या  माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या (Jilha PArishad) तसेच खाजगी शिक्षण संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.


या लिंकवर थेट अर्ज करा 


लवकरच पसंतीक्रम नोंदवण्याची  संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीच्या जाहिराती https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx  या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 


मुलाखत न देताही नोकरी मिळणार


पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या संकेतस्थळावरील मुख्य बारवर होम, डाउनलोड आणि एफएक्यू देण्यात आले आहे.  त्यातील डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना मुलाखती शिवाय भरल्या जाणाऱ्या जागा व मुलाखती घेऊन भरल्या जाणाऱ्या जागा दिसून येतील.  त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती व कोणत्या संवर्गासाठी जागा आहेत याबाबतचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरती संदर्भातील पुढील प्रक्रियेची सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मॅन्युअलही प्रसिद्ध करण्यात आले आहे. 


सेमी इंग्लिश शाळांमधल्या शिक्षकांची नोकरी धोक्यात


सेमी इंग्लिश शाळांमधल्या शिक्षकांसाठी एक धोक्याची घंटा आहे. सेमी इंग्लिश शाळांमधील जे शिक्षक 2022 मधील शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणा-यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय या शिक्षकांची इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून कौशल्य चाचणी घेण्यात येणार असून त्यात या शिक्षकांची कामगिरी असमाधानकारक राहिल्यास त्यांची सेवा समाप्त केली जाणारंय. याबाबतचे आदेश राज्याचे शिक्षण सूरज मांढरे यांनी दिले आहेत. पवित्र पोर्टरवर सेमी इंग्लिश शाळांकरता नोंदवण्यात आलेल्या मागणीला अनुसरून 2022 मध्ये सरकारमार्फत एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील उत्तीर्ण शिक्षकांची आणखी एक कौशल्य चाचणी घेतली जाणारंय.