अमर काणे, झी मीडिया, नागपूर : टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज उमेश यादवची (Umesh Yadav) लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या मॅनजेरनेच त्याची फसवणूक केली. याप्रकरणी नागपूरमधल्या कोराडी पोलीस ठाण्यात (Nagpur Koradi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश ठाकरे असं या व्यक्तीचं नाव असून तो एकेकाळी उमेश यादवचा मॅनेजर म्हणून काम पाहायचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शैलेश ठाकरेने केली आर्थिक फसवणूक 
उमेश यादव हा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आहे, क्रिकेटनिमित्ताने त्याला देशात आणि देशाबाहेर खेळण्यासाठी जावं लागतं. त्यामुळे उमेश यादवने त्याचा मित्र असलेल्या शैलेश ठाकरे याला पत्रव्यवहार, इन्कम टॅक्स, बँकेचे तसंच इतर व्यवहाराकरिता पगारी मॅनेजर म्हणून कामाला ठेवलं होतं. पण शैलेश ठाकरे याने त्याचा गैरफायदा घेतला. 


उमेश यादवने स्टेट बँक शाखेतील आपल्या खात्यात 44 लाख रुपये ठेवले होते. पण शैलेशने ते पैसे परस्पर काढून घेतले, आणि स्वत:च्यान नावावर प्रॉपर्टी खरेदी केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर उमेश यादवने कोराडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार शैलेश ठाकरेविरोधात कलम 406 ,420 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


उसेन बोल्टची करोडोंची फसवणूक
काही दिवसांपूर्वीच जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टची (World's Fastest Man Usain Bolt) करोडो रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं होतं. बोल्टची आयुष्यभराची कमाई काही क्षणात चोरीला गेले. बोल्टच्या खात्यातून तब्बल 98 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. बोल्टने जमैकामधील एका खासगी गुंतवणूक कंपनीच्या खात्यात हे पैसे ठेवले होते.  बोल्टचं हे खातं किंग्स्टन, जमैका स्टॉक्स अॅण्ड सिक्युरिटीज लिमिटेड (Stocks and Securities Limited (SSL)) या खासगी कंपनीत होतं. बोल्टने 2012 साली या कंपनीमध्ये खातं सुरु केलं होतं. 


बोल्टकडे आता केवळ 2 हजार डॉलर्स म्हणजे 1 लाख 62 रुपये शिल्लक राहिले आहेत. आपले पैसे 10 दिवसात मिळवून द्या अशी मागणी बोल्टने त्या कंपनीकडे केली आहे. वेळेत पैसे दिले नाहीत तर कंपनीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करु असा इशारा बोल्टने दिला आहे. उसेने बोल्टने ऑलिम्पिकमध्ये तब्बल 8 गोल्ड मेडल जिंकली आहेत. चीनमध्ये त्याने 100 आणि 200 मीटर शर्यतीत पदकं जिंकली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने 100, 200 आणि 4X100 मीटर शर्यतीतही सुवर्ण पदक पटकावलं होतं.