पुण्याला दहशतवाद्यांचा धोका?, पोलिसांनी काढलेल्या परिपत्रकामुळे चिंता
पुण्याला दहशतवाद्यांचा धोका नसल्याचंही पोलिसांनी म्हटले आहे.
पुणे : शहर सुरक्षित असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. पुण्याला दहशतवाद्यांचा धोका नसल्याचंही पोलिसांनी म्हटले आहे. बंडगार्डन पोलिसांनी काढलेल्या परिपत्रकामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. बंडगार्डन पोलिसांनी भाडेकरूंची माहिती देण्याचे आवाहन पुणेकरांना केले होते. या परिपत्रकात देशविघातक कृत्य करणाऱ्यांबाबतचा उल्लेख होता. या उल्लेखामुळं सामान्य पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी मात्र अशी कोणतीच गोष्ट नसल्याचा खुलासा केला आहे. पुणे शहर सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अतिरेकी कारवाया संदर्भात गुप्तचर खात्याकडून आलेल्या माहितीच्या आधारे हे परिपत्रक काढण्यात आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्वसाधारण माहितीच्या आधारे हे परिपत्रक काढण्यात आल्याची माहीती पुणे पोलीसांनी दिली आहे.
पुणे पोलिसांकडून एक नागरिकांसाठी परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकात देशविघातक कृत्य करणाऱ्यांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे पुण्याला दहशतवाद्यांचा धोका आहे, अशी समजूत अनेकांची झाली. त्यामुळे शहरात भितीच्या वातावरण पसरले होते. ही बाब लक्षात येताच पुणे पोलिसांनी तात्काळ खुलासा केला. गुप्तचर खात्याच्या माहितीच्या आधारे परिपत्रक काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, सर्वसाधारण माहितीच्या आधारे परिपत्रकर काढल्याचा खुलासा पोलिसांनी केला असून शहर सुरक्षित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.