अमर काणे, नागपूर : होय, तुम्ही ऐकताय ते खरं आहे. अफगाण तालिबानचा म्होरक्या मुल्ला अख्तर मंसूर २१ मे २०१६ रोजी इराण-पाकिस्तान सीमेवर मारला गेला. मात्र कराचीतील विशेष दहशतवादविरोधी न्यायालयात त्याच्याविरोधात खटला सुरूच आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुल्ला आणि त्याच्या साथीदारांनी अनेक ठिकाणी बेनामी मालमत्तांची खरेदी-विक्री केल्याचं उघड झालं. एकट्या कराचीमध्ये ३ कोटी २० लाख किंमतीच्या ५ मालमत्ता मुल्लानं घेतल्या होत्या. आणखी धक्कादायक बाब म्हणजे त्यानं स्वतःचा जीवनविमा उतरवला होता. त्यासाठी त्यानं ३ लाखांचा प्रिमियमही भरला होता.


मुल्लानं भरलेला हा प्रिमियम व्याजासह सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश आता न्यायालयानं दिले आहेत. कदाचित हे असं पहिलंच उदाहरण असावं. मात्र आपल्या गुप्तचर यंत्रणांनी आता सावध होणं गरजेचं आहे. 


दुसऱ्याच्याच नव्हे, तर स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करणाऱ्या तालिबानी अतिरेक्यानं आपल्या कुटुंबीयांच्या भविष्याची अशी तरतूद करावी, हे धक्कादायक आहे. यातून विमा कंपन्यांची तर फसवणूक होतेच, पण सुरक्षेच्या दृष्टीनंही हे अयोग्य आहे. FATF सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनीही याची दखल घेतली पाहिजे.