ओशोंच्या मृत्यूपत्रासंदर्भातला तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे
ओशो रजनिश यांचं खोट मृत्यूपत्र बनवून ट्रस्टनं कोट्यवधी रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप
पुणे : अध्यात्मिक गुरू ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्रासंदर्भातला तपास आता पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे, अशी माहिती पुणे पोलिसांच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली.
हायकोर्टाने याला मंजुरी दिलीय. गेल्या सुनावणीला या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात पुणे पोलीस आयुक्तांना आठवड्याभरात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले होते.
तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली खाली व्हावा अशी मागणी
याचिकाकर्ते योगेश ठक्कर यांनी या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली खाली व्हावा, अशी मागणी हायकोर्टात केली होती.
ओशो रजनिश यांचं खोट मृत्यूपत्र बनवून ट्रस्टनं कोट्यवधी रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप, ओशोंचे निकटवर्तीय आणि याचिकाकर्ता योगेश ठक्कर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.