TET Exam : 21 शिक्षक चांगल्या मार्काने पास होऊनही अपात्र, कारण वाचून धक्का बसेल
TET Exam News : धक्कादायक बातमी. शिक्षक पात्रता परीक्षेत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पास असूनही 21 शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
पुणे : TET Exam News : धक्कादायक बातमी. शिक्षक पात्रता परीक्षेत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पास असूनही 21 शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिक्षक पात्रता घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांची तपासणी करताना सायबर पोलिसांच्या हाती ही माहिती मिळाली आहे. आत्मविश्वास नसल्याने पास होण्यासाठी या शिक्षकांनी लाच दिली. त्यामुळे या शिक्षकांनाही पात्र परीक्षार्थींच्या यादीतून वगळण्यात आले आहे. (TET Exam: 21 Teacher passed with good marks but ineligible, because reading will be shocking)
दरम्यान, टीईटी नकली (TET Exam Scam ) प्रमाणपत्रातून पाच जणांनी 234 कोटींहून अधिक पैसे कमावल्याचा अंदाज आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पडताळणी न करता शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र स्वीकारल्याचे उघड झाले आहे. ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी अशी पडताळणी न करता ही सर्टीफिकेट घेतली ते शिक्षणाधिकारी आता रडारवर आहेत. तर 7900 उमेदवारांकडून 2 ते 3 लाख रूपये वसूल केल्याची माहिती उघड होत आहे. याप्रकरणी परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकरला अटक झाली. फरार एजंटचा शोध सुरु आहे.
या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. (TET Exam Scam : 300 fake certificates seized) शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आरोपींनी उमेदवारांना पोस्टानं पाठवलेली तीनशे बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 7 हजार 900 जणांना पात्र केल्याचे समोर आले आहे.