पुणे : TET scam case : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळा प्रकरण जळगावपर्यंत येऊन पोहोचले आहे. बुधवारी पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावात गोलाणी मार्केटमध्ये बालाजी जॉब प्लेसमेंटमध्ये झाडाझडती घेतली. संस्थेचे संचालक अ‍ॅड. विजय दर्जी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय दर्जी यांच्या कार्यालयातून आणखी काही पुरावे हस्तगत करण्यात आलेत. इतर दोघेही रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तांत्रिक पुराव्याच्या आधारावर दर्जी यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.


याप्रकरणात जळगाव, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, यावलमधील काही जण रडारवर आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळाप्रकरणी जळगाव, भडगावसह यावल आणि पारोळा तालुक्यातील काही एजंटाकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. 


शिक्षक पात्रता भरती घोटाळा प्रकरणात 7800 उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पोलीस आणि शिक्षण विभागाकडून पडताळणी सुरु आहे. जिल्हास्तरीय यादी करुन विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येत आहे. 


यासंदर्भातली सर्व माहिती पोलिसांनी शिक्षण विभागाला दिलीय. आर्थिक देवघेव करुन प्रमाणपत्र मिळवल्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या बोगस उमेदवारांचं धाबे चांगलेच दणाणलेय. 'झी 24 तास'ने सर्वप्रथम शिक्षक पात्रता भरती घोटाळा उघड केला होता.