Vaibhav Naik vs BJP: राज्यात सत्तांतर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून दिवसेंदिवस हा वाद वाढत चालला आहे. हा शाब्दिक वाद अनेकदा हाणामारीपर्यंत पोहोचल्याही पाहायला मिळत आहे. नुकतंच कणकवलीच्या कनेडी गावात भाजपा (BJP) आणि ठाकरे गटाच्या (Thackeray Faction) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. मात्र आता यातला आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) हातात दांडा घेऊन भाजपा कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत. 


नेमकं काय झालं होतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कनेडीतल्या वादाची सुरुवात भाजपा आणि ठाकरे गटाच्या पदाधिका-यांच्या बाचाबाचीनं झाली होती. मात्र नंतर त्याचं रुपांतर हाणामारीत झालं.. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तितक्यात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन तिथे पोहोचले. दांडा घेऊन ते भाजपा कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते. 



पण पोलिसांनी पोलिसांनी वैभव नाईक यांना अडवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. जर पोलीस घटनास्थळी नसते तर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता होती. दरम्यान वैभव नाईक यांचा घटनास्थळावरील व्हिडीओ मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.