MLA Nitin Deshmukh : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख मतदारसंघातील पाणीप्रश्नासाठी उपोषणाला बसलेत आणि राजकीय नेत्यांची धावपळ उडाली. (Nitin Deshmukh protested in the Vidhan Sabha)  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देशमुख यांची भेट घेतली. त्यांच्याकडील कागदपत्रे घेऊन ते तात्काळ थेट विधानसभा सभगृहात पोहोचले. त्यांनी ही बाब देवेंद्र फडणवीस यांच्या कानी घातली. त्यानंतर चक्र फिरलीत आणि मंत्री गिरीश महाजन तात्काळ नितीन देशमुख यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी यावेळी आश्वासन दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण केले आहे. त्यांनी विकास कामांत खोडा घालण्याचे काम केले आहे, असा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी विधानसभा परिसरात आंदोलन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आमदार नितीन देशमुख  विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरु आहे. उन्हात आंदोलनाला बसू नका अशी विनंती देशमुखांना ठाकरे गटाच्या आमदारांनी केली. मात्र नितीन देशमुख हे मात्र आपल्या आंदोलनावर ठाम राहिले. त्यानंतर राजकीय नेत्यांची धापळ उडाली. तर दुसरीकडे अकोल्यातही आमदार नितीन देशमुख यांच्या समर्थनात अकोल्यात ग्रामस्थांनी आंदोलन केले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला.


अकोला जिल्ह्यातील वान धरणातून होणाऱ्या 69 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या पाणी आरक्षणाला स्थगिती दिल्याचा विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी विधान भवन परिसरात आंदोलन सुरु केले आहे. विधान सभेत वेगाने चक्र फिरलीत आणि त्यांना आश्वासन देण्यात आले आहे. अकोला तालुक्यातील 69 गावांना वान धरणातून हा पाणीपुरवठा होणार होता याकरिता 108 कोटी खर्च करून 70 किलोमीटरची पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आली आहे. या स्थगिती विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असूनही देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठाला स्थगिती दिल्याचा आरोप बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.


स्थगिती उठवण्याकरिता राज्य सरकारला सोमवार पर्यंतची मुदत आमदार नितीन देशमुखांनी दिली होती. मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने विधान भवनात आमरण उपोषण देशमुखांनी सुरू केले. त्यांच्या समर्थनार्थ अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. 


भाजपचा केवळ शिवसेनेच्या मतदाससंघातील विकास कामांना विराेध असून, 60 टक्के काम झालेल्या 69 गावे पाणी पुरवठा याेजनेला स्थगिती देत फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण केले, अशी टीका आमदार देशमुख यांनी केली. राजकारण करुन जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याच्या निषेधार्थ विधिमंडळाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमाेर उपाेषण करणार असून, अकाेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ग्रामस्थ आंदोलन करतील, असाही इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी आज आंदोलन केले.